esakal | शरद पवार म्हणतात, ही लढाई आपण जिंकणारच

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 89 झाला असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

शरद पवार म्हणतात, ही लढाई आपण जिंकणारच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जनतेने पालन करावे. अपरिहार्यता असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. ही लढाई आपण जिंकणारच असून, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेचा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 89 झाला असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र, रविवारी जनता कर्फ्यु संपल्यानंतर अनेक नागरिक आज रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. यावरून शरद पवार यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केले आहे.

शरद पवार म्हणाले, की माझे नागरिकांना आवाहन आहे की अपरिहार्यता असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. प्रधानमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाची अति गांभार्याने नोंद घेऊन पोलिस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. ही लढाई आपण जिंकणारच, गरज आहे संयम, समंजसपणा व योग्य दक्षतेची! कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदी आदेश लागू करूनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. वाहनांवरून जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. इतर देशांतील परिस्थिती ध्यानात घेता नागरिकांनी वेळीच गांभीर्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.