जनतेचा आम्हाला विरोधात बसावे असाच कौल : शरद पवार

मिलिंद संगई
Saturday, 26 October 2019

दरम्यान, 30 तारखेला दुपारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे व नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेही या वेळी उपस्थित होते.

बारामती शहर : राज्यातील जनतेने आम्ही विरोधात बसावे असाच कौल दिलेला आहे, त्यामुळे वेगळ्या प्रस्तावावर चर्चा करण्यात अर्थ नाही. या पुढील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज (शनिवार) बारामतीत गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार व बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनीही ही दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा भेट आहे. आम्ही शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव दिला नाही किंवा शिवसेनेनेही आम्हाला प्रस्ताव दिला तर त्यासंदर्भात आम्ही दिल्लीशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले.

मात्र शिवसेनेकडून देखील आम्हाला कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शरद पवार यांनीही यावेळी सत्ता स्थापन करणे किंवा तिसरा पर्याय निर्माण करणे याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे सांगत जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे तो मी स्वीकारलेला आहे, मात्र भविष्यात जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात हात घालून काम करेल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाचा संदर्भात देखील काही चर्चा झालेली नाही , दिवाळीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र बसून सर्वच विषयांवर निर्णय घेईल असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, 30 तारखेला दुपारी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलावले असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे व नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेही या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar speaks about political situation in Maharashtra