PM Modi In Pune : PM मोदींच्या कार्यक्रमामुळे साहेबांसाठी इकडे आड-तिकडे विहिर; मोदींसोबत एका मंचावर बसू नये अशी नेत्यांची मागणी

व्यासपीठावर मोंदीसोबत शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे दोघेही उपस्थित राहणार आहेत
Sharad Pawar & pm modi
Sharad Pawar & pm modiEsakal

Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मंगळवारी, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या वर्षीचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान मोदी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा उद्या पुण्यात पार पडणार आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र असणार आहेत. त्यावर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. तर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येण्यावर काही नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर आपण या कार्यक्रमाला जाऊ नये, मोदींसोबत एका मंचावर बसू नये, अशी विनंती पुण्यातील ज्येष्ठ नेते करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar & pm modi
Mumbai-Jaipur Exp Firing: जयपुर मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार; घटनेत एका पोलीसासह ४ जणांचा मृत्यू

तर शरद पवार यांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदीबागेत जाऊन यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काही नेते त्यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार स्वीकारावा, यासाठी रोहित टिळक यांनी शरद पवार यांनाच मोदींना विनंती करायला सांगितली होती.

राज्यात सुरू असणाऱ्या चर्चेमुळे पवार पुण्यातील ज्येष्ठ मंडळीची विनंती लक्षात घेता मंगळवारी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार की या कार्यक्रमाला जाणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar & pm modi
Nitin Gadkari: "शरद पवार म्हणजे जपानी बाहुली"; गडकरींची शरद पवारांवर खोचक टीका

शरद पवारांनी मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाला जाऊ नये अशी 'इंडिया'मधील नेत्यांची भूमिका आहे. मात्र शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्यात कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. उद्या इंडियामधील पक्ष पंतप्रधान मोदी यांना विरोध करणार आहेत. व्यासपीठावर शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे दोघेही उपस्थित राहणार आहेत.

Sharad Pawar & pm modi
Accident News: मदुराई जिल्ह्यात कार अन् कंटेनरची धडक, भीषण अपघात 4 जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com