कोणाला हरियाणातून, कोणाला दिल्लीतून, राष्ट्रवादीने आमदारांना 'असं' परत आणलं!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

मुंबई : सध्या राज्यातील सत्ता संघर्षाला वेगळेच राजकीय वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शपथविधी घेतला. या नंतर राजकीय घडामोडींना वेग आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखीनच खळबळ उडाली. हा सत्तासंघर्ष आता सुप्रिम कोर्टात जाऊन ठेपला आहे. काही 11 आमदारांना सोेबत घेऊन अजित पवार यांनी हे बंड केले होते. आज त्यापैकी सर्वजण आता परत शरद पवार यांच्या गोटात पोहचले आहेत.  

संपर्काबाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांना अखेर मुंबईत आणण्यात आलं आहे. या आमदारांना विमानाने परत आणलं गेलं. आता अजित पवार वगळता सर्वच आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील आणि दौलत दरोडा यांना काल रात्री विमानाने मुंबईला आणलं. ते दोघं हरियाणातील गुरुग्राममध्ये असलेल्या एका हॉटेलात वास्तव्याला होते. तर आमदार नितीन पवारही काल मुंबईत दाखल झाले. आमदार नरहरी झिरवळ दिल्लीत एका सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती आहे. सर्व आमदारांना मुंबईतील ‘द हयात’ हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

अनिल पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर बाबासाहेब पाटील यांनीही आपण पवारांसोबत असल्याचं फेसबुकवरुनच स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत 52 आमदार आहेत. एका आमदारावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं. म्हणजेच केवळ अजित पवार सध्या सोबत नसल्याची माहिती आहे.

नितीन पवार शनिवारी पक्षाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून गेले ते परत आलेच नव्हते. तसेच त्यांच्याशी घरच्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. माझी काळजी करु नका, मी शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ, राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. माझ्या कुटुंबाने इतर कोणताही विचार करु नये. कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.’ असं नितीन पवार यांनी एका व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं होतं.

आधी आऊट ऑफ रीच, आता संपर्क

नितीन पवार – कळवण (नाशिक)
दौलत दरोडा – शहापूर (ठाणे)
अनिल भाईदास पाटील – अमळनेर (जळगाव)
नरहरी झिरवळ – दिंडोरी (नाशिक)
माणिकराव कोकाटे – सिन्नर (नाशिक)
बाबासाहेब पाटील – अहमदपूर (लातूर)
दिलीप बनकर – निफाड (नाशिक)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP contacts missing MLAs claims they are with party