Vidhan Sabha 2019 : भुजबळ, आव्हाड, रोहित पवारांसह निष्ठावंत चेहऱ्यांना संधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज साठे यांच्या नावांचा समावेश आहे. 

भाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे. 

राष्ट्रवादीच्या या पहिल्या 77 जणांच्या यादीमधे बहुतांश प्रमुख नेते व आजी माजी आमदारांचा समावेश आहे. तर नव्या चेहऱ्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यात आज प्रवेश केलेल्या माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP declares candidate list for Maharashtra Vidhan Sabha 2019