राष्ट्रवादी-शिवसेनेचं ठरलं; असा असेल फॉर्म्युला, काँग्रेसचंही समर्थन? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असतानाच राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर प्रस्ताव  ठेवला आहे. राष्ट्रवादीने आपल्या प्रस्तावात अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यात येण्याचा प्रस्तावा मांडण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असतानाच राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर प्रस्ताव  ठेवला आहे. राष्ट्रवादीने आपल्या प्रस्तावात अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यात येण्याचा प्रस्तावा मांडण्यात आला असून अशात काँग्रेसकडे मात्र, पाच वर्षे उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिवसेनेप्रमाणेच मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समान वाटपाची अपेक्षा आहे. सेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांमध्ये निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. बाहेरुन पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस पक्षाने थेट सत्तेत सहभागी व्हावं अशी अपेक्षा राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आली आहे. किमान समान कार्यक्रम यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. किमान समान कार्यक्रम बनवावा ही काँग्रेसचीच इच्छा आहे. 

राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात यापूर्वीही राजवट

दरम्यान, सत्तास्थापनेसाठी या निर्णयावर शिवसेनेला निर्णय घ्यायचा असून मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत आता शिवसेना काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सोडणार का? यावर शिवसेना काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP demands fifty fifty Formula for Power Sharing in maharashtra