Chandrakant Patil : किती हा ढोंगीपणा? चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात झळकले फ्लेक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil News

Chandrakant Patil : किती हा ढोंगीपणा? चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात झळकले फ्लेक्स

पुणेः पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात फ्लेक्स डकवण्यात आलेले आहेत. 'किती हा ढोंगीपणा?' असं म्हणत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत.

राष्ट्रवादीने ओबीसींच्या अवमानच्या मुद्द्यावरून भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी करण्यात आलेली आहे.

हेही वाचाः नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

"हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर आगोदर कारवाई करा? क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्यांना पाठीशी घालणारे आता ओबीसींच्या मानापनाच्या गोष्टी करणार? हा ढोंगीपणा बास करा" अशा मजकुराचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत.

फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आमदार चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्रातला ओबीसी तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असा देखील मजकूर या फ्लेक्सवर लिहला आहे.