sharad pawar
sharad pawaresakal

Sharad Pawar: राष्ट्रवादीत पवारांनी भाकरी फिरवली? रोहित पवारांची महत्त्वाच्या पदासाठी शिफारस

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पक्षाच्या कार्यक्रमात एक विधान केलं होतं, त्याविधानची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शरद पवार म्हणाले होते की, भाकरी ही फिरवावी लागते ती जर फिरवली नाही तर करपते. त्यामुळे आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही.

असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या विधानानंतर कर्जतचे आमदार रोहित पवार यांची एक महत्त्वाच्या पदासाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

राज्य विधिमंडळाच्या महत्वाच्या मानलं जाणाऱ्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी रोहित पवार यांचे नाव सुचवले असल्याची माहिती मिळत आहे. या पदासाठी रोहित पवार यांचे नाव सुचविण्यात आल्याने राष्ट्रवादीत पक्षात खरंच भाकरी फिरली काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

sharad pawar
Eknath Shinde: 'मी बदला घेणार' उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर एकनाथ शिंदेंचं खरमरीत प्रत्युत्तर

राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने रोहित पवार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षाचे आमदारच असतात.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत येऊन नऊ महिने झाले तरी देखील समिती अस्तित्वात आलेली नाही. त्यानंतर आता सरकारने हालचाली सुरू केल्या. या समितीच्या अध्यक्षपदासाठी आमदार रोहित पवार यांचे नाव राष्ट्रवादीने सुचवल्याची माहिती मिळत आहे. मात्र मित्र पक्षांबरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

sharad pawar
Maratha Reservation: आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार; काढणार मोठी यात्रा, जाणून घ्या...

तसेच आमदार सत्यजित तांबे हे राज्य विधानपरिषदेतून नामनिर्देशित केलेल्या पाच नेत्यांमध्ये आहेत. तांबे हे पहिल्यांदाच निवडणून आले आहेत. तांबे यांच्यासह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे अभिजीत वंजारी, ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे प्रविण दरेकर हे विधान परिषदेतून पाच नामनिर्देशित सदस्य असल्याची माहिती मिळत नाही.

लोकलेखा समिती ही राज्य विधिमंडळातील सर्वात महत्वाच्या समित्यांपैकी एक समिती आहे. या समितीत विधानसभेचे वीस आणि विधान परिषदेचे पाच सदस्य असतात. पीएसी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालांची छानणी ही समिती करते. या समितीचे प्रमुख सहसा विरोधी पक्षातील आमदार असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com