Jayant Patil : "राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांच्या पुण्याईवर उभा आहे"

शरद पवार कोणाला टाकून बोलत नाहीत, मान देतात, असंही जयंत पाटील म्हणाले.
Jayant Patil Sharad pawar
Jayant Patil Sharad pawarSakal
Updated on: 

शरद पवारांच्या पुण्याईवर राष्ट्रवादी पक्ष उभा आहे, असं विधान आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. एका खासगी वृत्त वाहिनीशी पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असंही ते म्हणाले आहेत.

जयंत पाटील म्हणाले,"पवार साहेबांची आकलन शक्ती प्रचंड आहे. राज्यातील कानाकोपऱ्याची माहिती त्यांना आहे. देशातल्या सर्व घटनांची ते बारकाईने नोंद ठेवतात. त्यांच्या अनुभवाचा प्रचंड फायदा सगळ्यांना होतो. राजकारणापेक्षा काम करणाऱ्यावर त्यांचा भर जास्त आहे. नाविन्याची त्यांना प्रचंड आवड आहे. ते कोणाला टाकून बोलत नाहीत. ते सर्वांना मान देतात."

Jayant Patil Sharad pawar
Jayant Patil : राष्ट्रवादीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण? जयंत पाटलांचं सूचक विधान

जयंत पाटील पुढे म्हणाले, "राज्यात त्यांनी माणसं जोडली आहेत. ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार नाही, तिथेही पक्षाचं काम करणारी कमीत कमी २०० ते ४०० लोक असतात. म्हणून म्हणतो, आमचा पक्ष पवार साहेबांच्या पुण्याईवर उभा आहे. त्यांच्याकडून काम कसं करायचं, लोकांशी कसं बोलायचं, शब्द कसे वापरायचे, कशा पद्धतीने माणसं जोडायची हे सगळं शिकायला मिळालं."

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

राज्यात राष्ट्रवादीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न त्यांना विचारला असता जयंत पाटील म्हणाले, "या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार हे संख्याबळावर ठरेल. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आलं तर मुख्यमंत्री कोण होणार हे पवार साहेबच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sharad Pawar Someshwar Election baramati
Sharad Pawar letter to Devendra Fadnavis
Jayant Patil BJP Entry sangli politics
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com