आता बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी! आव्हाडांकडून महिलेचा व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावा | Jitendra Awhad News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Jitendra awhad news

Jitendra Awhad: आता बलात्काराच्या गुन्ह्याची तयारी! आव्हाडांकडून महिलेचा व्हिडीओ शेअर करत धक्कादायक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

"354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणा-या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ मधील त्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरु आहे." असे ट्विट राष्ट्रवादीचे नेत जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Mumbai News : IPS देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

महत्वाचे म्हणजे ३५४ हे कलम विनयभंग तसेच लैंगिक छळवनुकीशी संबंधित आहे, तर ३७६ हे कलम बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधीत आहे. दरम्यान या आव्हाडांच्या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एक महिला कारमध्ये बसलेली दिसत आहे. आव्हाडांच्या या आरोपांनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: आता यूपी पळवणार महाराष्ट्रातले उद्योग? CM योगींच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

नेमकं झालं काय होतं

एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असे म्हणत ढकलले अशी तक्रार करण्यात आली होती.