MNS : बड्या मनसे नेत्याच्या सांगण्यावरून माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाडांचा गंभीर आरोप

ncp jitendra awhad says under 354 false case was registered after talking to big MNS leader
ncp jitendra awhad says under 354 false case was registered after talking to big MNS leader

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या शो मध्ये गोंधळ घातल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणात आव्हाडांनी मनसे नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनसे नेत्याने वरिष्ठ नेत्याशी बोलून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला असा आरोप त्यांनी केला आहे.

आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "हर हर महादेव चित्रपटादरम्यान विवियाना येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले."

"मी त्या ताईचा आभारी आहे, की त्या ताईने स्वत:हून सांगितले, की मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा" असा सवाल देखील आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

ncp jitendra awhad says under 354 false case was registered after talking to big MNS leader
VBA-Uddhav Thackeray Alliance : वंचित-ठाकरे गट युतीवर सामंतांची प्रतिक्रिया म्हणाले, त्यांच्याकडे आंबेडकर तर आमच्याकडे…

मराठी चित्रपटांत इतिहासाची मोडतोड केली असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यादरम्यान ९ नोव्हेंबरला ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी परिक्षित धुर्वे आणि त्यांच्या पत्नी यांना धक्काबुक्की झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी आव्हाडांवर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला, यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

ncp jitendra awhad says under 354 false case was registered after talking to big MNS leader
Maharashtra Politics : राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्येच जुंपली! NCP च्या आरोपांना धानोरकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com