...ही तर लोकशाहीची थट्टा; अजित पवार कडाडले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

सभागृहामध्ये प्रत्येकाला मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे. सभागृहाचे कामकाज एकतर्फी चालले आहे. विरोधकांना आरोप करण्याचा परवानगी तुम्ही देत नाही. तुम्ही विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहात. ही लोकशाही आहे का? लोकशाहीची थट्टा चालली आहे. भूखंड गैरव्यवहाराचे आरोप पटलावर घ्या. सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे.

मुंबई : बालेवाडीतील भुखंड गैरव्यवहाराच्या आरोपात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात निवेदन दिले असताना विरोधकांचेही म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. ही लोकशाही आहे का? लोकशाहीची थट्टा चालली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान विरोधी पक्षांनी संबंधित मंत्र्यांच्या भ्रष्टाचारविषयी बोलण्याची परवानगी विधानसभा अध्यक्षांकडे रितसर मागितली. मात्र, दिलेली कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत बोलण्याची परवानगी नाकारल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. ही लोकशाहीची थट्टा चालवली असल्याचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांचं पाप उघड करण्याची संधी द्यावी. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नये असे सांगितले. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी व संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी नियमावर बोट ठेवल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. 

अजित पवार म्हणाले, की सभागृहामध्ये प्रत्येकाला मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे. सभागृहाचे कामकाज एकतर्फी चालले आहे. विरोधकांना आरोप करण्याचा परवानगी तुम्ही देत नाही. तुम्ही विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहात. ही लोकशाही आहे का? लोकशाहीची थट्टा चालली आहे. भूखंड गैरव्यवहाराचे आरोप पटलावर घ्या. सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar attacks government on Chandrakant Patil land scam