Ajit Pawar: अजित पवार म्हणतात पक्ष सोडणार नाही पण सोशल मिडिया प्रोफाइलवर तर...

अजित पवारांनी सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा उल्लेख असलेले वॉलपेपर हटवला!
Ajit Pawar
Ajit Pawar esakal

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वारंवार चर्चा होत आहेत आणि अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. तर अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असून त्यांच्या सह्या घेतल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केलं आहे.

अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा आणखी गडद होत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं..
Facebook And Twitter
Facebook And Twitter Esakal

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अशातच एका इंग्रजी वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील माहिती दिली आहे. दरम्यान अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar: अजित पवारांना जाहीर पाठिंबा देणाऱ्या अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया, म्हणाले 'आम्ही, अजितदादा...'

अजित पवार हे भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशा चर्चा सुरू असतांनाच पवार यांच्या सोशल मिडियावरील वॉलपेपर हटवणं यावरून पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar: दौरे रद्दच्या अफवेनंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com