अजित पवारांनी पद बदलले, पण पक्ष तोच ठेवला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांची गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते भेट घेत आहेत. पण, अद्याप अजित पवारांचे मन वळविण्यात त्यांना यश आलेले नाही. उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. त्यानंतर या सरकारचे भविष्य ठरणार आहे.

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (रविवार) अखेर आपल्या ट्विटर अकाऊंटवर नावापुढे उपमुख्यमंत्री असे लावले. पण, त्यांनी आपण अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याचे ठेवले आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतल्यानंतर लगेच ट्विटरवर चिफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र असे लिहिले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला होता. अजित पवारांनी काही आमदारांसह राजभवनात शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आपला याला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणतेच अधिकार नाहीत. कालपासून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.

फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी

अजित पवार यांची गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते भेट घेत आहेत. पण, अद्याप अजित पवारांचे मन वळविण्यात त्यांना यश आलेले नाही. उद्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी आहे. त्यानंतर या सरकारचे भविष्य ठरणार आहे. यापूर्वी फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू पद मिळाल्यानंतर ट्विटर अकाउंटवर केअरटेकर असे लावले होते. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीत त्यांनी सेवक असे लिहिले होते. आता पुन्हा शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री लिहिले आहे. आता आज अजित पवार यांनी आपल्या नावापुढे उपमुख्यमंत्री असे लिहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar didnot change on twitter account