अजित पवार नाराज आहेत काय? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

नेत्यांची वेगवेगळी उत्तरे 
अजित पवार कुठे आहेत, या प्रश्‍नावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पोचले तेव्हा अजितदादा तेथे नव्हते. ते कुठे आहेत, यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात, धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात आणि रोहित पवार यांनी पुण्यात, असे उत्तर दिले. ते नक्की कुठे आहेत, याचे एकच उत्तर मिळत नव्हते. 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याची नेमकी कारणे काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

गेले काही दिवस अजित दादा नाराज होते काय? असा प्रश्‍न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारासाठी काढलेल्या यात्रेत दादा फारसे दिसले नाहीत, याकडेही लक्ष वेधले जात होते. अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढली जात आहे, असे लोकांना वाटते. आज दिवसभर ईडी प्रकरणातही अजितदादा कोठेही दिसले नाहीत. बारामतीत पूर आल्याने ते तिकडेच होते. लोकसभा निवडणुकीत पवारांनी आपला मुलगा पार्थसाठी शब्द टाकून उमेदवारी मिळवली होती. त्याही वेळी ते काही कारणाने नाराज आहेत का, असा प्रश्‍न केला जात होता. 

नेत्यांची वेगवेगळी उत्तरे 
अजित पवार कुठे आहेत, या प्रश्‍नावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पोचले तेव्हा अजितदादा तेथे नव्हते. ते कुठे आहेत, यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात, धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात आणि रोहित पवार यांनी पुण्यात, असे उत्तर दिले. ते नक्की कुठे आहेत, याचे एकच उत्तर मिळत नव्हते. 

तटकरे अनुपस्थितीत 
अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुनील तटकरे मुंबईत हजर नव्हते. त्याबद्दल चौकशी केली असता कर्जत येथील त्यांचा पूर्वनियोजित दौरा रद्द करता येणे शक्‍य नसल्याने ते हजर नसल्याचे सांगण्यात आले. 

चौकशी कुणी लावली? छ नांदगावकर 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामागे सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) चौकशी कोणी लावली, याची मुख्यमंत्र्यांनी निःपक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. पक्षाने आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला. पवार यांना भविष्यात "ईडी'च्या कार्यालयात जावे लागेल का, याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. वय आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या राजकीय व्यक्तीला चौकशीसाठी बोलावणार का, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे नांदगावकर म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar disappointed for internal politics