Ajit Pawar: 'जे वाजपेयी-अडवाणींना जमलं नाही ते...' अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

Ajit Pawar
Ajit Pawaresakal

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. संपादक सम्राट फडणीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पवारांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले. 2014 आणि 2019 मध्ये भाजपला केवळ पंतप्रधान मोदींमुळेच विजय मिळाला म्हणतात मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.

Ajit Pawar
Indapur: छत्रपती कारखान्यात धुरळा उडणार! तीन वर्ष लांबलेली निवडणूक होणार; न्यायलयाचा मोठा निर्णय

सकाळच्या दिलखुलास कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना जे शक्य नव्हते ते नरेंद्र मोदींनी केले.

1984 नंतर देशात पहिल्यांदा 2014 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले. यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना सरकार स्थापनेसाठी इतर दोघांचा पाठिंबा घ्यावा लागला, पण २०१४ मध्ये मोदींनी आपला करिष्मा दाखवला.

Ajit Pawar
Sakal Podcast : मुख्यमंत्री मराठा समाजासोबत ते गद्दारीचा सरकारी सिनेमा

अजित पवार पुढे म्हणाले की, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण आता त्यांच्या नंतर कोण येणार असा प्रश्न पडला असताना दुसरे नाव दिसत नाही.

दरम्यान यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आलं की, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती.

तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असंही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com