Vidhan Sabha 2019 : अजित पवार यांची एवढी आहे संपत्ती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर एकूण 27 कोटी 56 लाख रुपये तर, पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर 47 कोटी 16 लाख रुपये इतकी मालमत्ता आहे. निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात या बाबत माहिती देण्यात आली आहे. 

बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर एकूण 27 कोटी 56 लाख रुपये तर, पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर 47 कोटी 16 लाख रुपये इतकी मालमत्ता आहे. निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात या बाबत माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, अजित पवार यांच्यावर 1 कोटी 5 लाखांचे तर सुनेत्रा पवार यांच्या नावावर 2 कोटी 68 लाख रुपयांची देणी आहेत. या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या वाहनांचीही माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडे 2 ट्रॅक्टर, 4 ट्रेलर, होंडा अँकॉर्ड, होंडा सीआरव्ही व टोयाटोची कॅम्री या तीन गाड्या आहेत. या वाहनांचे मूल्यांकन 88 लाख 97 हजार इतके आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या नावावर एक ट्रॅक्टर, एक ट्रेलर व एक इनोव्हा गाडी आहे. याची किंमत 28 लाख 68 हजार इतकी आहे. 

अजित पवार यांच्याकडे 13 लाख 90 हजारांचे सोने चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू असून सुनेत्रा पवार यांच्याकडे 61 लाख 56 हजारांचे दागिने व मौल्यवान वस्तू आहेत. अजित पवार यांच्याकडे 76 लाख 65 हजारांच्या तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 3 कोटी 13 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. अजित पवार यांच्याकडे शेतजमिन, निवासी सदनिका, भूखंड अशी मालमत्ता आहे. अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader ajit pawar property Baramati vidhan Sabha