अजित पवारांनी पदभार स्वीकारलाच नाही; भाजपच्या गोटात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

बंडखोर अजित पवार यांनी मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई : शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. यानंतर आज फडणवीस यांनी पदभार स्विकारला आहे. परंतू बंडखोर अजित पवार यांनी मात्र उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके अजित पवार यांच्या मनात काय सुरु आहे, याचा कोणालाही थांगरत्ता लागत नााही. यामुळे भाजपच्या गोटातही संभ्रम  झाला आहे. 

बहुमत नसताना सरकार स्थापन करण्यात आल्याने याविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या अंतिम निर्णय होणार आहे. त्यानंतरच काय चित्र असणार आहे हे स्पष्ट होईल. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानभवनात पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही केली. ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. तर फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे. दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात
आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader and Dy CM Ajit Pawar did not take charge