esakal | पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत नव्या नेत्याच्या हाती गृहमंत्रीपदाची धुरा सोपविली आहे. गृहमंत्रिपदासाठी अनिल देशमुख यांच्या नावाची चर्चा आगोदरपासून सुरु होती. यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. 

पुण्याच्या जावयाला मिळाली गृहमंत्रिपदाची जबाबदारी, पाहा कोण?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे आज (रविवार) खातेवाटप झाले असून, आगोदर शिवसेनेकडे असलेले गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. राष्ट्रवादीत या पदासाठी अनेकजण उत्सुक असताना विदर्भातील नेते अनिल देशमुख यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर करत नव्या नेत्याच्या हाती गृहमंत्रीपदाची धुरा सोपविली आहे. गृहमंत्रिपदासाठी अनिल देशमुख यांच्या नावाची चर्चा आगोदरपासून सुरु होती. यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांना डावलून अनिल देशमुख यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती

अनिल देशमुख हे पहिल्यांदा १९९५ साली आमदार झाले. त्याआधी नागपूर जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचा ते विदर्भातला चेहरा असून गेल्या वेळी पुतण्या आशिष देशमुखने भाजपकडून लढून त्यांना पराभूत केले पण त्यानंतर सतत संपर्क ठेवून त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. स्वच्छ प्रतिमा तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचे ओझे नसल्याने शरद पवार त्यांच्यावर सर्वाधिक महत्वाच्या खात्या जबाबदारी सोपविणार असल्याचे बोलले जात होते. अखेर झालेही तसेच. यापूर्वी अनिल देशमुख यांनी युतीच्या सरकारात सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून महत्वाचे कार्यक्रम आग्रहाने नागपुरात केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. ते पुण्याचे जावई आहेत.

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला होता. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली होती. त्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून खातेवाटप रखडल्याने टीका होत होती. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.