छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चुकीचे

संजय मिस्कीन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादीचे दिग्गज व पहिल्या फळीतले नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, स्वतः भुजबळ यांनीच या अफवा असल्याचे सांगत कोठेही जाणार नसल्याचे म्हटले 

मुंबई : भारतीय जनता पक्षाने काॅंग्रेस व राष्ट्रवादीवर गळ टाकलेले असताना शिवसेनेही आता राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली आहे. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा सुरु असताना स्वतः भुजबळ यांनीच राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले आहे. 

राष्ट्रवादीचे दिग्गज व पहिल्या फळीतले नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र, स्वतः भुजबळ यांनीच या अफवा असल्याचे सांगत कोठेही जाणार नसल्याचे म्हटले आहे.

आज मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करत असून ते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जातात. छगन भुजबळ हे सुरूवातीला शिवसेनेचे नेते होते. तब्बल 27 वर्षानंतर भुजबळ हे परत शिवसेनेत परतत असल्याने राज्याच्या राजकारणात सर्वात मोठे पक्षांतर ठरेल असे वाटत होते. पण, तसे होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Changan Bhujbal comeback to shivsena