
राज्यातील विधिमंडळातील शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदे गटानं ताब्यात घेतल्यावर आता संसदेतील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाला देण्यात आलंय.
Political News : उद्या 'ते' बाळासाहेबांची बसण्याची जागाही घेऊन जातील; NCP नेत्याची घणाघाती टीका
Maharashtra Politics : आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचं घटनापीठ स्थापन करण्याबाबतची मागणी ठाकरे गटानं (Thackeray Group) केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीये.
दरम्यान, आता आमदारांच्या अपात्रतेबाबत आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होत आहे. याशिवाय, निवडणूक आयोगानं दोन दिवसांपूर्वी शिवसेना (Shiv Sena) पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला, त्यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
या प्रकरणात आता राष्ट्रवादीनं देखील उडी घेतलीये. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केलीये. राज्यातील विधिमंडळातील शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदे गटानं ताब्यात घेतल्यावर आता संसदेतील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाला देण्यात आलंय.
यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं वेगळं आहे आणि भाजपचं वेगळं आहे. म्हणून, भाजप शिवसेना संपवयाला निघालीये. काहींना ईडीची नोटीस होती. काही लोक तिकडं गेल्यानंतर ईडी कारवाई बंद झाली. स्क्रिप्ट तयार होती, त्यानुसार केलं असा आरोप भुजबळांनी केलाय.
आता थोडाफार विश्वास न्यायालयावर आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर आहे. त्यांनी लवकरात लवकर हा संघर्ष संपवायला पाहिजे. उद्या मातोश्री आणि बाळासाहेबांची बसण्याची जागाही हे लोक घेऊन जातील. त्यावरही दावा सांगतील, हे आता थांबायला पाहिजे, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आम्ही बाहेर पडलो. काहींनी नवीन पक्ष काढले. पण, असं काही झालं नाही. अजूनही सहानुभूती उद्धव ठाकरे यांना आहे. हे या लोकांच्या का लक्षात येत नाही, असंही ते म्हणाले.