Uddhav Thackeray : ...तेव्हा उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज 'हे' चित्र नसतं; भूजबळांचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray : ...तेव्हा उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज 'हे' चित्र नसतं; भूजबळांचं मोठं विधान

Uddhav Thackeray : ...तेव्हा उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज 'हे' चित्र नसतं; भूजबळांचं मोठं विधान

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी आज उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत मोठं विधान केलं आहे. तेव्हा त्यांनी घाई केली नसती तर आज वेगळं चित्र राहिलं असतं ते म्हणाले.

छगन भूजबळ म्हणाले की, सध्या राज्यभरातून उद्धव ठाकरे यांच्यामागे सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल. परंतु सत्तासंघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंनी घाई केली नसती तर आज परिस्थिती वेगळी असती. परंतु जर आणि तरला काहीही अर्थ नाही. मतदार ठाकरेंसोबत आहेत, असा विश्वास भूजबळांनी व्यक्त केला.

हेही वाचाः हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा हा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला आहे. जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाला. न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील लढाईसंदर्भात भूजबळ म्हणाले की, वकील वेगवेगळे मुद्दे उपस्थित करीत आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहाणं महत्त्वाचं आहे. येत्या दोन-तीन दिवसांत निकाल येईल, असं ते म्हणाले.

एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करुन घ्यावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शरद पवार यांच्या घरावही त्यामुळे हल्ला झाला. ही मागणी सरकारने गांभीर्याने घेऊन विलिनीकरण करुन घ्यावे, अशी मागणी छगन भूजबळ यांनी केली आहे.