Corona Update : अजित पवारांपोठापाठ भुजबळांनाही कोरोनाची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal 1111.jpg

Corona Update : अजित पवारांपोठापाठ भुजबळांनाही कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तेच्या अस्तित्त्वाबद्दल टांगती तलवार असताना दुसरीकडे राज्यातील मंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट एकापाठोपाठ पॉझिटिव्ह येत आहे. दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ट्वीट करत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. (Chagan Bhujbal Covid19 Report Tested Positive)

छगन भुजबळ यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

हेही वाचा: भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं? वाचा सविस्तर

काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Ncp Leader Chhagan Bhujbal Tests Positive For Covid19 Announces On Twitter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..