फडणवीस म्हणजे, उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; एकनाथ खडसेंचा घणाघात I Eknath Khadse | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse vs Devendra Fadnavis

राज्यात महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना रंगताना दिसतोय.

फडणवीस म्हणजे, उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; एकनाथ खडसेंचा घणाघात

राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरुय. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुध्द भाजप असा सामना रंगताना दिसतोय. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधलाय. अनेकांची तोंडं एकाच पक्षात राहूनही वेगवेगळ्या दिशेला असतात. ते सर्व एकत्र आल्याशिवाय समन्वय साधता येणार नाहीय. सत्तेसाठी आसुसलेली माणसं सत्ता मिळत नाही, म्हणून वेगवेगळे उपद्व्याप करत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावलाय.

खडसे पुढे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस आघाडी सरकार स्थिर होत आहे, त्यामुळं हे सरकार आता अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुय. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आता रस्त्यावर उतरायची वेळ आलीय. त्यातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालंय. सत्ता कधी मिळवायची, यासाठी नवरा उतावळा झालाय, असा घणाघात त्यांनी केलाय.

हेही वाचा: 'मी माझा कायमचा राजीनामा सोनिया गांधींकडं देऊन ठेवलाय'

सत्तेसाठी भाजपवाल्यांनी फोन टॅपिंग देखील सुरू केलंय. 67 दिवस माझा फोन टॅप केला. इतकी हलकट आणि नीच प्रवृत्ती मी राजकारणात पाहिली नाही. या राज्यात राष्ट्रपती राजवट आणावी आणि मागच्या दरानं सत्ता आणावी हा यांचा हेतू आहे, अशी टीका खडसेंनी भाजपवर केलीय. 2024 ला आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Ncp Leader Eknath Khadse Criticizes Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top