राज्यात जातीय दंगल घडवून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न; जयंत पाटलांचा गंभीर आरोप I Jayant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant Patil

'सुडबुद्धीच्या राजकारणाचा परिणाम आज भाजपला कळत नाहीय; पण..'

राज्यात जातीय दंगल घडवून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील, अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेशच राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलाय. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळं राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात भोंगा वाजवण्याचा प्रयत्न सुरु झालाय. यावरून राज्यात जातीय दंगल घडेल असा कयास बांधला जातोय. राज्यात जातीय दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न सुरुय. तसंच सुडबुद्धीच्या राजकारणाचा परिणाम आज भाजपला कळत नाहीय. परंतु, ज्या दिवशी भाजपला कळेल त्या दिवशी भाजपकडं काहीही राहणार नाहीय, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा: राज ठाकरेंवरील टीकेनंतर शालिनीताईंचा प्रकाश आंबेडकरांच्या मुलावर प्रहार

ईडीनं कोणतीही पूर्वकल्पना न देता संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. ईडीला संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणायचीच होती तर आधी त्यांना माहिती दिली पाहिजे होती. त्यामुळं ही कारवाई म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतोय, असं वक्तव्यही राष्ट्रवादी काँग्रसच्या प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केलंय.

Web Title: Ncp Leader Jayant Patil Criticizes Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..