राष्ट्रवादीचा बहुचर्चित व्हिप, अजित पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

https://www.esakal.com/mumbai/shivsena-mp-sanjay-raut-tweets-30-nov-239815आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असताना, सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते प्रताप चिखलीकर यांची भेट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय जातंय.

मुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते जयंत पाटील यांनी आज (ता. 30) बहुमत चाचणीपूर्वी व्हिप जारी केला आहे. गटनेत्यांनी व्हिप जारी केल्याने आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना हा पक्षादेश मान्य करावा लागेल. या व्हिपमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधीमंडळात बहुमत चाचणी वेळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनाच मतदान करावे, असे आदेश या व्हिपमधून देण्यात आला आहे. विश्वासदर्शक ठराव, पारदर्शक पद्धतीने होईल, असं मत जयंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

अजित पवार यांनाही व्हिप लागू
दरम्यान, आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असताना, सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते प्रताप चिखलीकर यांची भेट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय जातंय. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात भाजपशी हात मिळवणी करून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे अजित पवार यांनी चिखलीकरांची भेट घेतल्यामुळं महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढल्याचं मानलं जातंय. पण, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते जयंत पाटील यांनी व्हिप काढल्यामुळं अजित पवार यांना त्या व्हिपनुसार महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनेच सभागृहात मतदान करावे लागणार आहे. 

आणखी बातम्या वाचा - उद्धव ठाकरेंची आज बहुमत चाचणी

आणखी बातम्या वाचा - बहुमत चाचणीपूर्वी संजय राऊत यांचं ट्विट वाचा

उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला?
महाविकास आघाडीकडे जवळपास 170 आमदारांचे बहुमत असल्याचा दावा नेत्यांनी केला होता. आता हे 170 आमदारांचे बहुमत महाविकास आघाडीला सभागृहात सिद्ध करावं लागणार आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून तसेच काही अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, आज काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळं उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित झाले आहे. आता हे पद अजित पवार यांना देण्यात येणार? याची उत्सुकता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप पक्षाचा निर्णय झालेला नाही. यावर  शरद पवारच निर्णय घेतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jayant patil Whip for party mla ajit pawar