शरद पवार हिंदूविरोधी; राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या पत्रकावर आव्हाड म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

राष्ट्रीय वारकरी परिषदेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेने गंभीर आरोप केला आहे, शरद पवारांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने या पत्रकात म्हटले आहे. पवार हिंदूविरोधी असल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हिंदूविरोधी असून, त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रकानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत असून, जितेंद्र आव्हाड यांनी हे वारकरी परिषदवाले कोण आहेत याची ओळख द्यायला नको असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रीय वारकरी परिषदेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. शरद पवार हिंदूविरोधी असल्याचा राष्ट्रीय वारकरी परिषदेने गंभीर आरोप केला आहे, शरद पवारांना वारकऱ्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने या पत्रकात म्हटले आहे. पवार हिंदूविरोधी असल्याचा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. 

सर्व संप्रदायाची वारकरी मंडळी पंढरपुरात आलेली असता त्यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आहे. शरद पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिकवादी मंडळींना पाठिंबा देण्याचे काम करतात. त्यामुळे शरद पवारांना यापुढे कुठल्याही कार्यक्रमाला वारकऱ्यांनी बोलावू नये, अशा आशयाचं हे पत्रक आहे. वक्ते महाराजांनी हे पत्रक काढले असून, त्यांना 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारचा ग्यानबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे. वक्ते महाराज हे हिंदुत्ववादी संघटनांच्या जवळचे समजले जातात.

यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे, की वारकरी प्रथा परंपरा सुरु झाली ती इथल्या कर्मकांडाविरुद्ध पांडुरंग भक्तीमध्ये तल्लीन झालेले संत याचेच प्रभोधन करत होते आणि कट्टर मनुवादी त्याला विरोध. हे वारकरी परिषदवाले कोण आहेत याची ओळख द्यायला नको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jitendra Awhad statement about Sharad Pawar and warkari parishad