कोश्यारींवर सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या, पण आव्हाडांची दोनच शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत Jitendra Awhad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad tweet on bhagatsingh koshyari

Jitendra Awhad : कोश्यारींवर सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या, पण आव्हाडांची दोनच शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी आता नव्या राज्यपालांची नियक्ती करण्यात आलीय. (President Murmu accepts the resignation Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari Ramesh Bais has been appointed)

कोश्यारी यांच्या जागी रमेश बैंस यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.'' अशी प्रतिक्रिया राज्यपालांनी दिली.

महाराष्ट्राची सुटका झाली- पवार

माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय जो आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल झाली नव्हाती ती आपण पाहिली.केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी हा बदल केला ही समाधानकारक बाब आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन दोन शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे. 'ब्याद गेली' असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केली. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली. सर्वांच्या प्रतिक्रिया एकीकडे आणि एकट्या आव्हाडांची दोन शब्दांची प्रतिक्रिया एकीकडे, असा नेटकऱ्यांचा सूर आहे.

कोण आहेत रमेश बैस?

बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते.सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते.