महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून भाजपसोबत : मधुकर पिचड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखविली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दैदिप्यमान देश घडावा, यासाठी आमचा पाठिंबा असले.

मुंबई : महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून आम्ही भाजपसोबत जात असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते मधुकर पिचड यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मास्टरस्ट्रोक मारत विरोधी पक्षातील चार आमदारांना आपल्या पक्षात समावून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चार आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आणि काँग्रेसच्या एक आमदाराचा समावेश आहे. मुधकर पिचड, चित्रा वाघ यांनीही यावेळी भाजप प्रवेश केला. 

भाजप प्रवेशानंतर पिचड म्हणाले, की मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्हाला वाट दाखविली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दैदिप्यमान देश घडावा, यासाठी आमचा पाठिंबा असले. मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांना आमचे पूर्ण सहकार्य राहिल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Madhukar Pichad enters BJP in Mumbai