esakal | 'पाहुणे गेल्यानंतर मी बोलीन', अजित पवारांचं सूचक वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

'पाहुणे गेल्यानंतर मी बोलीन', अजित पवारांचं सूचक वक्तव्य

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (ajit pawar) संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारीची (income tax raid) कारवाई सुरु आहे. त्यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी इन्कम टॅक्सचा पाहुणे असा उल्लेख केला आहे.

"पाहुणे घरी आहेत. वेगवेगळ्या घरांमध्ये आहेत. त्यांचं काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला जे काय बोलायचय ते बोलीन. मला जे बोलायचय ते काल मी बोललोय. नियमाने जे असेल ते जनतेसमोर येईल, त्यात घाबरण्यासारख काय आहे" असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: सोने दराचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने! खरेदीसाठी 'हीच' वेळ

काल संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार (parth pawar) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला. मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाली. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर सकाळपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. त्या बद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा: PLAY-OFF च्या आधीच KKRने दिली महत्त्वाची बातमी; वाचा सविस्तर

काल अजित पवार काय म्हणाले...

"छापेमारी करणं हा आयकर विभागाचा अधिकार आहे. मी कधीही कर चुकवेगिरी केलेली नाही" असे अजित पवार म्हणाले. "आयकर खात्याला शंका असेल, तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली. मी स्वत: राज्याचा अर्थमंत्री आहे. त्यामुळे मी माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांचा दरवर्षी नियमितपणे टॅक्स भरतो. राजकीय हेतुने इन्कम टॅक्सने छापा मारला की, त्यामागे आणखी काय हेतु होता? ते इन्कम टॅक्सचं सांगू शकते" असे अजित पवार म्हणाले.

loading image
go to top