'शिवसेना म्हणजे आता महाराष्ट्राला सर्कस दाखविणारा पक्ष'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 March 2019

कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे, ते शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता. पण आज उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठा भाऊ मानलं. काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली.

बारामती : युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देवून किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होतोय. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली असून, या पोस्टमधून त्यांनी भाजप व शिवसेना युतीवर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी लिहिले आहे, की कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई करायचे, ते शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता. पण आज उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठा भाऊ मानलं. काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करुन दाखवली. पाच वर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणत मगरीचे अश्रू ढाळले आणि आत्ता मुद्दे सोडून व्यक्तिगत टिका करु लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच सख्य आठवलं की काळीज, कोथळा, वाघनखे हे शब्द आजही आठवतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Rohit Pawar facebook post against Shivsena BJP alliance