पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना पाहा काय दिल्या शुभेच्छा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहे. आज पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटरवरून शुभेच्छा दिल्या.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहे. आज पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटरवरून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शरद पवार हे नाव महाराष्ट्राला नवखं नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेल्या शरद पवार नावाचं गारूड अजूनही कमी झालेलं नाही. आजही वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार एखाद्या तरुणासारखं फिरत आहेत. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवार महाराष्ट्राचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले.

तसेच १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (इंदिरा) २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते. शरद पवार यांचा राजकारणासह अनेक क्षेत्रांचा खोल अभ्यास आहे. त्यांनी क्रिकेटच्या विश्वातील सरर्वाेच्च असणारी पदे देखील भूषविली आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader sharad pawar birthday special