अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार, म्हणतात... (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात काका म्हणजे माझा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव घेण्यात आले. त्यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ट लावण्यात आले. त्यांनी त्यांच्या मुलासोबत याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर संपर्क साधलेला नाही. त्यांचा स्वभाव असाच आहे. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, की ते कठोर निर्णय घेतात.

पुणे : अजित पवार यांनी आज राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याची चर्चा केली नव्हती. अशा परिस्थितीत राजीनामा देण्याची त्यांनी काहीही माहिती दिली नाही. अजित पवारांनी राजीनाम्याविषयी माझ्याशीही कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही. ते आपल्या कुटुंबासह मुलांनाही राजकारणापासून दूर ठेवणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कुटुंबात त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात काका म्हणजे माझा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव घेण्यात आले. त्यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ट लावण्यात आले. त्यांनी त्यांच्या मुलासोबत याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर संपर्क साधलेला नाही. त्यांचा स्वभाव असाच आहे. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, की ते कठोर निर्णय घेतात.

ईडीच्या कारवाईबाबत पवार म्हणाले, की महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे मला जावे लागेल. ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे. पण, मी कुठल्याही बँकेचा संचालक नाही. ईडीने मला कार्यालयात येण्याची काही आवश्यकता नसल्याचे सांगितले. कार्यालयाबाहेर कलम 144 लागू करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असल्याने पोलिस आयुक्तांनी मला सांगितले, की त्याठिकाणी जाऊ नये. महाराष्ट्रातून प्रतिक्रिया आल्याने मी तेथे न जाण्याचा निर्णय घेतला. पुणे, बारामती परिसरात पुरस्थिती निर्माण झाल्याने मी आज पुण्यात आलो. खडकवासला भागातील अनेक ठिकाणी पाहणी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar press conference pune ajit pawar resignation

Tags
टॉपिकस
Topic Tags: