Sharad Pawar : "...म्हणून संसदेत जायची भीती वाटते"; PM मोदींचा उल्लेख करत पवारांचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar PM Narendra Modi
Sharad Pawar : "...म्हणून संसदेत जायची भीती वाटते"; PM मोदींचा उल्लेख करत पवारांचा टोला

Sharad Pawar : "...म्हणून संसदेत जायची भीती वाटते"; PM मोदींचा उल्लेख करत पवारांचा टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला दिल्लीच्या संसदेत जायची भीती वाटत असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत त्यांना टोलाही लगावला आहे.

पिंपरी इथं झालेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुशीलकुमार शिंदे हेही उपस्थित होते. त्यावेळी शिंदे यांनी आपण शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो, असल्याचं सांगितलं. यावरुन शरद पवारांनी हे विधान केलं आहे.

हेही वाचा: Ajit Pawar : 'त्या' वक्तव्याबद्दल अजित पवारांनी मागितली माफी

शरद पवार म्हणाले, "बोलता बोलता सुशीलकुमार शिंदे म्हणाले की मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो. पण असं कुणी म्हटलं की मला भयंकर भीती वाटते. कारण आधीही कोणीतरी म्हटलं होतं की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलोय. तेव्हापासून मी दिल्लीच्या संसदेत जायला घाबरतो."

शरद पवारांच्या या विधानानंतर सभागृहात हास्याची लाट उमटली. पंतप्रधान मोदींना शरद पवारांनी नाव न घेता टोला लगावला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले होते की मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो आहे.