उदयनराजे-रामराजेंचा एकाचवेळी प्रवेश; पवारांना धक्का देण्यासाठी भाजपची खेळी 

संजय मिस्कीन
Wednesday, 21 August 2019

उदयनराजे यांचे प्रतिस्पर्धी शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप मधे प्रवेश केल्यानंतर रामराजे व आता उदयनराजे यांनाही भाजपकडे खेचण्यात मुख्यमंत्र्याना यश आले. पश्चिम महाराष्ट्रात महापुराने नागरिकांमधे सरकार विरोधात रोष असल्याने हा प्रवेश लांबल्याचे सांगण्यात येते.

मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसचे दिग्गज नेते व छत्रपती घराण्यांचे वारस उदयन राजे भोसले व रामराजे निंबाळकर यांचा एकाच वेळी एकाच व्यासपिठावर भाजप प्रवेशाचा सोहळा करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का देण्यात येईल अशी माहिती आहे. 

उदयनराजे यांचे प्रतिस्पर्धी शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप मधे प्रवेश केल्यानंतर रामराजे व आता उदयनराजे यांनाही भाजपकडे खेचण्यात मुख्यमंत्र्याना यश आले. पश्चिम महाराष्ट्रात महापुराने नागरिकांमधे सरकार विरोधात रोष असल्याने हा प्रवेश लांबल्याचे सांगण्यात येते. महापुरानंतर राष्ट्रवादीने सरकार वर जोदार टिकास्र सोडले. त्याला प्रत्तूत्तर म्हणून दोन्ही राजेंना एकाच व्यासपिठावर आणून राष्ट्रवादी व शरद पवार यांना जोरदार धक्का देण्यात येईल असे सांगण्यात येते. 

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्र राजे व उदयन राजे यांच्यातही समेट घडवून आणल्याचा दावा करण्यात येत असून हे दोन्ही राजे भाजपमधे एकदिलाने काम करतील असा विश्वास आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leaders Udyanraje Bhosale and Ramraje Nimbalkar may be entered BJP