राज्यात शिवसेनेला साथ देऊ, पण...; राष्ट्रवादीची 'ही' आहे अट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

मुख्यमंत्रिपदाबद्दल आशावादी असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक एक अट ठेवल्याचं माहिती मिळत आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त मुंबई मिररने दिले आहे. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आली असल्याचे वृत्त 'मुंबई मिरर'नं प्रसिद्ध केलं आहे.

मुंबई : मुख्यमंत्रिपदाबद्दल आशावादी असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक एक अट ठेवल्याचं माहिती मिळत आहे. याबाबतचं अधिकृत वृत्त मुंबई मिररने दिले आहे. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आली असल्याचे वृत्त 'मुंबई मिरर'नं प्रसिद्ध केलं आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र भाजपपासून लांब राहण्याबद्दलच्या निर्णयावर शिवसेना कितपत गंभीर आहे, हे राष्ट्रवादीला पाहायचं आहे. त्यामुळेच शिवसेनेनं भाजपासोबत असलेले त्यांचे केंद्रापासूनचे संबंध संपुष्टात आणावेत, अशी अट राष्ट्रवादीनं शिवसेनेसमोर ठेवली आहे.

'राष्ट्रवादीशी आघाडी करून काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करू असा दावा शिवसेना करते. हे समीकरण त्यांना खरोखरच जुळवून आणायचं असेल, तर त्यांनी केंद्रातलं मंत्रिपद सोडावं. त्यांनी असं पाऊल उचललं तरच ते गंभीर असल्याचं आम्हाला समजेल. शिवसेना हा निर्णय घेणार नसेल, तर मग यात काही अर्थ नाही,' असं राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं म्हटलं असल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी मे महिन्यात केंद्रात अवजड उद्योग मंत्रालयाची धुरा स्वीकारली आहे. शिवसेना खासदार अनंत गीते यांच्याकडे  मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात या मंत्रालयाची जबाबदारी होती. मात्र, यंदा गीते पराभूत झाले. त्यानंतर सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP may supports shivsena in Maharashtra