NCP: नुसते बोलून चालणार नाही, आता हवा ओबीसी प्रदेशाध्यक्ष ! ज्येष्ठ नेत्याचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत मोठं बदल होण्याची चर्चा
ncp mharashtra president should be obc chagan bhujbal
ncp mharashtra president should be obc chagan bhujbal

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. (ncp mharashtra president should be obc chagan bhujbal sharad pawar ajit pawar jitendra awhad)

जयंत पाटील हे मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. प्रत्येकी तीन वर्षांनंतर प्रदेशाध्यक्ष हे पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या वक्तव्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. अशातच छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

ncp mharashtra president should be obc chagan bhujbal
Ajit Pawar Video : 'विरोधी पक्षनेते पद नको! मला संघटनेत पद द्या', अजित पवार-जयंत पाटील वाद चव्हाट्यावर

पक्ष नेते पदावर एकसमाज व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष पदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी. अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

ncp mharashtra president should be obc chagan bhujbal
Jayant Patil: 'राष्ट्रवादी' सर्वांत मोठा पक्ष होईल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास; तर शिरसाटांची उडवली खिल्ली

आमचा पक्ष जो आहे तो लोकशाहीने चालणार पक्ष आहे. त्यात प्रत्येक जन आपले मत व्यक्त करतात. मला फक्त प्रदेशाध्यक्ष चार महिनेच मिळाले. पूर्वी विधी मंडळ नेता एक समजाचा असेल तर दुसरे पद समजाचे जायचे त्यामुळे आपण ओबीसी म्हणतो. आता नुसते बोलून चालणार नाही.

भाजपने बावनकुळे ओबीसी अध्यक्ष केला. काँग्रेसने नाना पटोले अध्यक्ष ओबीसी आहे. संजय राऊतदेखील ओबीसी आहेत. आमच्या पक्षात ओबीसीला जबाबदारी दिली पाहिजेल. त्यामुले ओबीसी समाज जोडू शकतो. आमच्या पक्षात ओबीसी नेते आहेत. तटकरे, मुंडे, आव्हाड आहेत,मला दिले तर मी काम करीन. असं मोठं वक्तव्य भुजबळ यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com