"सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा नाव न घेता नितेश राणेंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा नाव न घेता नितेश राणेंना टोला

"सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा नाव न घेता नितेश राणेंना टोला

मुंबईत आजपासून भाजपची आशीर्वाद यात्रा सुरू होणार झाली आहे. मुंबईतील सर्व 6 लोकसभा मतदारसंघात आशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही यात्रा तीन टप्प्यात पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले.

5 मार्च रोजी लोकसभेच्या 2 जागांवर, 9 रोजी 2 लोकसभेच्या आणि 11 रोजी 2 लोकसभा जागांवर आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यादरम्यान शहरातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये देव दर्शन घेत हा यात्र पुढे जाणार आहे.

दरम्यान या यात्रेवर आणि नितेश राणेंवर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विट करत एका प्रकारे इशाराच दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "महाराष्ट्र द्रोह्यानो आशीर्वाद यात्रेत शेतकरी कांदे हाणून तुम्हाला आशिर्वाद द्यायला उत्सुक आहेत.

तुम्ही सुरुवातीला यात्रा काढा पण शेवट तुमच्या पक्षाची प्रेतयात्रा काढून शेतकरी समारोप करतील. मागची जन आशिर्वाद यात्रा आठवा, सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका" असं ट्विट केलं आहे. याकाळात कांदा प्रश्न चांगलाच तापला आहे. सोबतच विरोधी पक्ष नेते देखील सरकारवर टीका करत आहे.

नितेश राणेंवर नाव न घेता मिटकरी यांनी टीका केली आहे. एका पत्रकार परिषदमध्ये अजित पवारांनी नितेश राणे यांचा टिल्ल्या म्हणून उल्लेख केला होता. तोच धागा पकडत मिटकरी म्हणाले की "सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका" अशी टीका केली आहे.

२०१९ साली लोकसभा निवडणुकीत भाजप आणि तत्कालीन मित्रपक्ष शिवसेना यांनी मुंबईतील प्रत्येकी तीन मतदारसंघ जिंकले. भाजपने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व आणि मुंबई उत्तर मध्यच्या जागा जिंकल्या तर शिवसेनेने मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिमच्या जागा जिंकल्या.

मुंबईतील शिवसेनेच्या तीन खासदारांपैकी, मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे आणि मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात आहेत. तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघांवर भाजप हातपाय पसरताना दिसत आहे.

टॅग्स :Shiv SenaBjp