esakal | आदित्य ठाकरेंसोबत समन्वयाने काम करणार : रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

कर्जतमध्ये विकास झाला नव्हता. रस्ते, जलयुक्त शिवार अभियान कामे केली मात्र त्यामध्ये अपहार झाला. लोकांना बदल हवा होता. निवडणूक लोकांनी हातात घेतली होती, त्या दिवशी पाऊस सुरू होता जोरदार पाऊस होता. राम शिंदे यांना भेटलो त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. त्यांना बरोबर घेऊन विकास कसा करता येईल ते पाहिलं. माझ्याबद्दल साहेबांनी अनेक शब्द चांगले बोलल्याने अश्रू अनावर सैनिकांचा आदर याचा राजकीय फायदा घेतला.

आदित्य ठाकरेंसोबत समन्वयाने काम करणार : रोहित पवार

sakal_logo
By
सागर आव्हाड

बारामती : ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांच्याशी माझी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, आम्ही दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे विधानभवनात महत्त्वाच्या निर्णयांमध्ये समन्वयाने काम करण्याचे ठरविले असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित पवार यांनी साम वाहिनीला मुलाखत दिली. रोहित पवार यांनी राज्यातील भविष्यातील राजकारणाविषयी भाष्य करत राष्ट्रवादीतून गेलेल्या गयारामांवर जोरदार टीका केली.

रोहित पवार म्हणाले, ''मी कोणाची कॉपी करत नाही. राज्यात पुढील काळात वेगळा विकासाचा पॅटर्न पाहायला मिळेल. आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देऊन चर्चा केली समन्वयाने विधानसभेत आम्ही काम करू. कारण, नवी पिढी ही विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देणारी आहे. विकासाची चर्चा होणार असेल तर समन्वय होणे गरजेचे आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनीही कधी खिळ घातली नाही. पवार-विखे वाद नवीन पिढीत येणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. नगर जिल्ह्यात आम्ही एकत्र काम करणार आहोत. सोडून गेलेले पैलवानांनी जास्त तेल लावलं त्यामुळे जनतेच्या हातून निसटले आणि ते पडले. पैलवान नवीन आले आहेत, मात्र वस्ताद मार्गदर्शक फक्त पवारसाहेब आहेत.'' 

कर्जतमध्ये विकास झाला नव्हता. रस्ते, जलयुक्त शिवार अभियान कामे केली मात्र त्यामध्ये अपहार झाला. लोकांना बदल हवा होता. निवडणूक लोकांनी हातात घेतली होती, त्या दिवशी पाऊस सुरू होता जोरदार पाऊस होता. राम शिंदे यांना भेटलो त्यांच्या आईचे आशीर्वादही घेतले. त्यांना बरोबर घेऊन विकास कसा करता येईल ते पाहिलं. माझ्याबद्दल साहेबांनी अनेक शब्द चांगले बोलल्याने अश्रू अनावर सैनिकांचा आदर याचा राजकीय फायदा घेतला. अजित पवारांचे घरातील वागणे वेगळे आहे. त्यांनी मला सायकल शिकवली आहे. स्वभाव वेगळा आहे त्यांनी मला खूप समजून घेतले आहे. विधानसभेत त्याचे मला खूप मार्गदर्शन मिळणार आहे. निकाल योग्यच लागला आहे विकास चांगला करायचा आहे. आम्ही चांगले विरोधक म्हणून काम करू.
कोणाची कॉपी करून कोण मोठा नेता होऊ शकत नाही, असेही रोहित पवार यांनी सांगितले.