Talathi Exam 2023 : 'कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… यात काही काळंबेरं आहे?'; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

talathi exam
talathi exam

तलाठी भरतीसाठी राज्यभरातील अनेक परीक्षाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता आज अनेक परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

"तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?" असे रोहित पवार म्हणाले आहेत.

talathi exam
Talathi Bharti 2023 Exam : तलाठी परीक्षेत गोंधळ! राज्यात अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन; हजारो परीक्षार्थी खोळंबले

नेमकं काय झालं?

आज राज्यात तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharati Exam 2023) सकाळी ९ ते ११ या काळात होणार होती. मात्र यावेळी अनेक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर, अकोला , अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये तलाठी भरती प्रतिक्रियेत हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला होता. वॉकीटॉकीच्या साहाय्याने पेपर फोडण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते.

talathi exam
Prakash Raj : प्रकाश राज यांनी उडवली चांद्रयान-३ ची खिल्ली, नेटकरी प्रचंड संतापले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com