esakal | Coronavirus : रोहित पवारांकडून मोदींचे स्वागत; चालू केली 'ही' नवी मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

NCP MLA rohit Pawar suports PM Narendra Modi

दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत करत सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या झेड्याचा फोटो ठेवण्याचे आवाहन करत नवी मोहीम चालू केली आहे. 

Coronavirus : रोहित पवारांकडून मोदींचे स्वागत; चालू केली 'ही' नवी मोहीम

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत करत सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या झेड्याचा फोटो ठेवण्याचे आवाहन करत नवी मोहीम चालू केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या रविवारी (ता. ५) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातले दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे किंवा मोबाईल टाॅर्च लावा, असे आवाहन मोदीं यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केले. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मात्र या आवाहनाचे स्वागत केले आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनंही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत दोन लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत सहा हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.