राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराचा भाजपप्रवेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपचे संकल्पपत्र जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक धक्के बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज (मंगळवार) आणखी एक धक्का बसला असून, विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपचे संकल्पपत्र जाहीर होण्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. 

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीच करण्यात न आल्याचा आरोप वडकुते यांनी केला आहे. वडकुते यांना हिंगोली विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या सर्वांतून वडकुते यांनी अखेर घड्याळ उतरवून कमळ हातात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLC Ramrao Wadkute enters BJP in Mumbai