'शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये'

शेतकरी आंदोलनाला वर्ष होण्याआधी मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला आहे.

'शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय! मोदी सरकार देर आये, दुरुस्त आये'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली. गुरु नानक जयंतीच्या मुहुर्तावर त्यांनी देशवासियांशी संवाद साधताना कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करणार असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सिंघु बॉर्डरवर लावण्यात आलेले खिळ्यांचे बॅरिकेड्स काढण्यात आले होते. तसंच शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतरही आंदोलन मागे घेण्यात आले नव्हते. अखेर शेतकरी आंदोलनाला वर्ष होण्याआधी मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला आहे.

कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना देर आये दुरुस्त आये असं म्हटलं आहे. कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी दीर्घकाळ दाखवलेला एकजुटीचा हा विजय आहे.

हेही वाचा: आमच्या तपस्येत उणीव, कोणाला दोष देण्यात अर्थ नाही - PM मोदी

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामागे उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कदाचित फटका बसू शकतो याची धास्ती असेल किंवा पश्चातबुद्धी असेल. पण कायदे मागे घेतले ही गोष्ट शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कायदे मागे घेतल्याबद्दल माननीय पंतप्रधान यांचे मी आभार मानतो. देर आये दुरुस्त आहे असंच मी या निर्णयाचे वर्णन करेन असंही कोल्हे यांनी म्हटलं.

loading image
go to top