Supriya Sule : मराठी संस्कृती, साडी अन् सुप्रिया सुळे! स्पष्टीकरण देत म्हणाल्या, "भाषण सुरू होण्यापूर्वी..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Supriya Sule
Supriya Sule : मराठी संस्कृती, साडी अन् सुप्रिया सुळे! स्पष्टीकरण देत म्हणाल्या, "भाषण सुरू होण्यापूर्वी..."

Supriya Sule : मराठी संस्कृती, साडी अन् सुप्रिया सुळे! स्पष्टीकरण देत म्हणाल्या, "भाषण सुरू होण्यापूर्वी..."

टिकलीविषयीच्या संभाजी भिडेंच्या विधानानंतर आता सुप्रिया सुळेंचं एक विधानही वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. मराठी पत्रकार महिला साडी का घालत नाहीत? जीन्स टॉप का घालतात, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. त्यानंतर आता हा वाद चांगलाच वाढताना दिसत आहे. याच विधानाबद्दल सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Supriya Sule News: या नेत्यांना सोलणार का? सुप्रिया सुळेंच्या 'त्या' व्हिडिओवर चित्रा वाघ यांचा सवाल

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुळेंवर जोरदार टीका केली आहे. टीका करणं चुकीचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे, असं वाघ म्हणाल्या आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळेंनी आपल्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या, "माझं भाषण सुरू होण्यापूर्वी तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले. या भाषणात कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझं मत मांडलं. कोणी काय घालावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, हे सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे ते भाषण सगळ्यांनी पूर्ण ऐकावं. माझं ३५ मिनिटांचं भाषण १७ सेकंदात दाखवण्यात येणार असेल, तर त्यावर काय बोलणार?"

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Supriya Sule: फडणवीस आपसे ये उमीद ना थी...सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

काय बोलल्या होत्या सुप्रिया सुळे?

पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या अधिवेशनात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या, न्यूज चॅनेलमधल्या मुली साडी का नेसत नाहीत? मराठी भाषा बोलताना ना, मग मराठी संस्कृती सारखे कपडे का घालत नाहीत? केवळ दिवाळीत तयार होऊन येता, नियम फक्त आम्हालाच आहेत का? फॅशन आयकॉन तुम्ही नाहीत आणि आम्ही नाहीत असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.