Supriya Sule : 'संपत्ती वाढली...', सुप्रिया सुळेची अहवालावर पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ
Supriya Sule
Supriya SuleEsakal

सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1-1 खासदाराचा समावेश आहे. तर सर्वात जास्त महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.

ADR Report
ADR ReportEsakal

एडीआरच्या अहवालानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51.53 कोटी रुपये इतकी होती. तर 2019 मध्ये 173 टक्क्यांनी वाढून 140.88 कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, AIUDF चे खासदार बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांची संपत्ती 30 कोटी रुपये होती तर 2019 मध्ये त्यांची संपत्ती 78 कोटी रुपये इतकी झाली.

Supriya Sule
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ; आकडा ऐकला तर...

यासंदर्भात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना अहवाल खोटा असल्याचे सांगत आपल्या संपत्तीमध्ये वाढ झालेली नाही. माझ्या संपत्तीची कागदपत्रं तपासून पाहा. ही माहिती खोटी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.

एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने हा अहवाल दिला आहे. 2009 आणि 2019 दरम्यान पुन्हा निवडून आलेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत 286 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे. खासदारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही माहिती मिळवल्याचा दावा संस्थेने केला आहे. या अहवालानुसार देशातल्या खासदारांमध्ये सर्वाधिक संपत्ती शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या खासदार हरसीमरत कौर बादल यांची वाढली आहे. बादल यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 157 कोटींची वाढ झाली आहे.

Supriya Sule
Kasba Bypoll Election : "सात-आठ महिन्यांसाठी इतर पक्षांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढू नये"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com