मुंबईत राष्ट्रवादीला माेठा धक्का; अध्यक्षच करणार शिवसेनेत प्रवेश

 सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

सचिन अहिर यांनी या स्वत:च्या वरळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी राष्ट्रवादीला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनीही स्थानिक पदाधिकाऱयांशी चर्चा करून अहीर प्रवेश करत असल्याचे अवगत केले. 

मुंबई : राजधानी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर गुरुवारी (ता. 25) शिवसेनेत प्रवश करणार आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला हा सर्वात मोठा दणका असून, राजधानीत राष्ट्रवादीचे निवडणुकांच्या अगोदरच पानिपत झाल्याची चर्चा सुरू आहे. 

बुधवारी सचिन अहिर यांनी या स्वत:च्या वरळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी राष्ट्रवादीला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनीही स्थानिक पदाधिकाऱयांशी चर्चा करून अहीर प्रवेश करत असल्याचे अवगत केले. अहिर हे मुंबईतील राष्ट्रवादीचा चेहरा असून राज्य मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री राहिलेले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येेष्ठ नेते जयंत पाटील यांचे अहिर यांना राेखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP mumbai leader Sachin Ahir to join ShivSena