'झूठ की सारी दीवारों को गिराते जाएँगे’, आणखी एक खुलासा? नवाब मलिकांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

'झूठ की सारी दीवारों को गिराते जाएँगे’, नवाब मलिकांचा इशारा

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (NCP Nawab malik) यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन आक्रमक शैलीत विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. आता आणखी एक ट्विट करत मलिकांनी इशारा दिला आहे. "सच का आईना ज़माने को दिखाते जाएँगे, झूठ की सारी दीवारों को गिराते जाएंगे’ असे सूचक ट्विट नवाब मलिकांनी केले आहे.

वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न

नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आतापर्यंत त्यांचे जात प्रमाणपत्र समोर आले नव्हते. आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (kranti redkar) यांनी समीर यांचे जात व जन्म प्रमाणपत्र ट्विट केले आहे. यावर मलिकांनी ट्विट करत इशारा केला आहे.

काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ट संबंध

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना मलिक म्हणाले की, ‘समीर वानखेडे विभागीय संचालक असताना गोवाही त्यांच्या अखत्यारित येतं. सगळ्या जगाला माहित आहे की गोव्यात ड्रग्जचा धंदा चालतो. पण तिकडे कोणतीच कारवाई होत नाही, कारण काशिफ खानच्या माध्यमातून सगळं रॅकेट गोव्यात चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ट संबंध आहेत. म्हणून त्याच्यावर कारवाई होत नाही. मी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो, तुम्ही काशिफ खानला चौकशीसाठी का बोलावलं नाही’, असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

loading image
go to top