esakal | ‘राष्ट्रवादी’चे लक्ष आता दलित समाजाकडे
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

उपमुख्यमंत्रिपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला बुधवारी (ता.१) मानवंदना दिली, तर आज चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. शिवाय दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेवर भेट देऊन कामाचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निकालाचा आढावा घेतला होता.

‘राष्ट्रवादी’चे लक्ष आता दलित समाजाकडे

sakal_logo
By
दीपा कदम

मुंबई - राज्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरावलेल्या दलित मतदारांना पक्षाकडे पुन्हा वळविण्यासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्रिपदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला बुधवारी (ता.१) मानवंदना दिली, तर आज चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. शिवाय दादर येथील इंदू मिलच्या जमिनीवर होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेवर भेट देऊन कामाचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निकालाचा आढावा घेतला होता. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत त्यांनी ‘राष्ट्रवादी’पासून दुरावलेल्या दलित मतदारांना पुन्हा पक्षाकडे वळविण्यासाठी व्यूहरचना आखण्याची आवश्‍यकता व्यक्त केली होती.

खातेवाटपाचा घोळ संपेना!  

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. मात्र ‘राष्ट्रवादी’च्या मतांचा टक्का १७.२ टक्‍क्‍यांवरून १६.७ टक्‍क्‍यापर्यंत खाली आहे. दलित, आदिवासींची पारंपरिक मते मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. दलित, आदिवासींची मते वंचित बहुजन आघाडीकडे वळल्याने काँग्रेस - ‘राष्ट्रवादी’ला ३५ जागांवर नुकसान झाले आहे. त्यामुळेच यापुढे दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक न्याय विभागदेखील स्वतःकडेच राहावा यावर भर दिला आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत दलित समाजात अधिक काम करण्यासाठी ‘राष्ट्रवादी’कडून प्रयत्न केला जाणार आहे.

loading image
go to top