Sharad Pawar In Nashik : "पक्ष बेकायदेशीर, मग त्याच पक्षाच्या नावावर तुम्ही मंत्री कसे झाले?"

Sharad Pawar Speech Today : नाशिक येथील सभेआधी ते माध्यमांशी बोलत होते.
Sharad Pawar
Sharad Pawar Sakal
Updated on

Maharashtra Political Crisis : नाशिक येथील येवला येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असून "मै ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ, मै तो फायर हूँ" असं वक्तव्य करत आपण अजून राजकारणात सक्रीय असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार गटाने या पक्षाची रचना चुकीची आहे यावर केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी आपलं उत्तर दिलं असून "जो पक्ष बेकायदेशीर आहे त्याच पक्षाच्या नावाव तुम्ही मंत्री कसे झालात? या बेकायदेशीर पक्षाच्या नियुक्त्या तुम्ही कशा केल्या?" असा प्रती सवाल शरद पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर जे राष्ट्रवादी सोडून गेले आहेत ते परत निवडून येणार नाहीत असंही पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar
"राजकारणात संधी, खुर्ची मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते"; शरद पवारांचा 'तो' जुना Video Viral

शरद पवार पुढे म्हणाले की, १९८० साली मी जेव्हा काँग्रेस मधून बाहेर पडलो त्यावेळी नाशिक जिल्ह्याने आम्हांला जागा निवडून दिल्या. त्यावेळी लागोपाठ येवल्यातून जागा निवडून आल्या. आता नाशिकच्या सहकाऱ्यांनी छगन भुजबळ यांनी येवल्यातून लढावं हे सुचवलं होतं. भुजबळांना सेफ जागा द्यायची होती म्हणून येवल्याची जागा निवडली आणि तिथे आम्हाला यश आलं.

वयाबद्दल बोलतांना पवार म्हणाले की, यापूर्वी अनेकांनी जोमानं मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. आमच्यासोबत मोरारार्जी देसाई अत्यंत जोमाने काम करायचे. तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते देशाचं किती काम करतात, याची याची चर्चा देशभरात व्हायची. त्यामुळे वयाचा काहीही मुद्दा नसल्याचं पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.