ईडीच्या कार्यालयात जाणारचं : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवार) उपस्थित राहणार आहेत.

मुंबईः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवार) उपस्थित राहणार आहेत. ईडीने पत्र दिले असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे. पण, ईडीच्या कार्यालयात जाणारचं, असे राष्ट्रवादीचे नेते नवान मलिक यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना ईडीने पत्र दिले असून तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे म्हटले आहे, तसेच भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. परंतु शरद पवार यांनी मात्र, अजून पत्र आलं नसल्याचे म्हटले असून पत्र आल्याच्या गोष्टीला त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाला आहे.

शरद पवार हे आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहचणार आहेत. मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, मी शुक्रवारी दुपारी 2 वाजता ‘ईडी’च्या कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये, असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे केले आहे. शिवाय, राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलिस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पवार यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp president sharad pawar will visit ed office says nawab malik